सातारा: जिल्ह्यातील वाळू ठेक्‍यांचे होणार लिलाव

दोन प्लॉट शासकीय कामांसाठी राखीव: ई ऑक्‍शन प्रक्रिया राबविणार

सातारा – राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रातील वाळू उपशावर बंदी घातल्यानंतर आता काही अटींवर सातारा जिल्ह्यातील 19 वाळू ठेक्‍यांचे लिलाव काढण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून 19 पैकी कोरेगाव तालुक्‍यातील रहिमतपूर व तांदुळवाडी येथील ठेके शासकीय कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

-Ads-

वाळू लिलाव होणाऱ्या ठेक्‍यांमध्ये वाई तालुक्‍यातील ओझर्डे, एकसर, कराड तालुक्‍यातील नांदगाव, वाठार, काले-चपणेमळी, शिरवडे, कोरेगाव तालुक्‍यातील तांदुळवाडीतील 3, मंगळापूरमधील 2, रहिमतपूरमधील 2 तसेच किरोली व बोबडेवाडी, फलटण तालुक्‍यातील शिंदेनगर व माण तालुक्‍यातील वर म्हसवड अशा 19 ठेक्‍यांचा समावेश आहे. लिलावाची अपसेट प्राईज ठरविण्याचा प्रस्ताव पुणे आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून त्यानंतर लिलावाचा अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, हरित लवादाने उपशावर बंदी घातल्याने जिल्ह्यात वाळूची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. त्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे अखेर पाच महिन्यानंतर काही अटींवर 19 वाळू ठेक्‍यांचे लिलाव होणार असल्याने बांधकाम क्षेत्राला थोडाफार दिलासा मिळणार आहे तसेच होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत मोठया प्रमाणात बोली लागणार असल्याने शासनाला महसूलाची रक्कम ही मोठ्या प्रमाणात मिळू शकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)