जिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणांचे फायर ऑडिट करावे

नगर: राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रामुख्याने मुंबई येथे अंधेरीमध्ये तसेच इतर ठिकाणी काही दिवसांपासून आगीच्या गंभीर घटना घडत आहे. त्यामध्ये अनेक निष्पाप व्यक्तींचा बळी जात आहेत. अशा घटना घडल्यावर फायर ऑडिट कडे लक्ष घातले जाते.

जिल्ह्यातील महत्त्वाचे दवाखाने,शैक्षणिक संस्था,शासकीय खाजगी उंच इमारती तसेच कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा वापर तसेच विद्युत उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे किंवा इतर कारणांमुळे इमारतीस आग लागण्याची दाट शक्‍यता असते. खरंतर शासकीय नियमनुसार दर सहा महिने असे वर्षातून दोनदा फायर ऑडिट करणे हे बंधनकारक आहे. परंतु या नियमाची पायमल्ली होत असताना आपणास दिसत आहे.

तसेच अनेक इमारती आज नव्याने बांधले जात आहेत त्यात फायर ऑडिट केल्याशिवाय पूर्वतत्त्वाचा दाखला देण्यात येऊ नये. यापूर्वी सर्वांचे फायर ऑडिट संदर्भात सर्व मान्यवर संस्थांची व दवाखान्याची चौकशी करण्यात यावी. जर इथून पुढे अहमदनगर जिल्ह्यात कुठल्याही अतिमहत्त्वाच्या ठिकाणी आग लागून जीवित हानीची घटना घडल्यास आणि त्या संस्थेचे फायर ऑडिट नसल्यास त्यास पूर्णता स्थानिक प्रशासन जबाबदार राहील आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन एक महिन्यात सर्व फायर ऑडिट रिपोर्ट करून घ्यावी ही नम्र विनंती या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)