जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सातारा,दि.21(प्रतिनिधी)
आगामी लोकसभेच्या पार्श्‍वभुमीवर राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांच्या सातारा जिल्ह्यात बदल्यांचे आदेश पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी गुरूवारी दिले आहेत.

निडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर गत निवडणुकीत जिल्ह्यात काम केलेल्या तसेच जिल्ह्यात तीन वर्षे पुर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निवडणुक आयोगाने शासनाला दिले होते. त्यानुसात गत आठवड्यात पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर गुरूवारी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बसल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांची सोलापूर ग्रामीणला, खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची पुणे ग्रामीणला, प्रभाकर मोरे यांची सोलापूर ग्रामीणवरून साताऱ्याला बदली झाली आहे.

तर मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन माने यांची पुणे ग्रामीणला, पुणे ग्रामीणचे अजय गोरड यांची साताऱ्याला बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)