जिल्ह्यातील धरणे 90 ते 95 टक्के भरली, अतिवृष्टीबाबत सतर्कतेचे आवाहन

सातारा – हवामान खात्याच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात येत्या 72 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे ही साधारणत: 90 ते 95 टक्के इतकी भरलेली आहेत. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. या सर्व बाबींचा विचार करता धरणांमधून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरु करावा लागणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी नदी, नाले, ओढे, इ. पासून दूर राहून सतर्क राहणे आवश्‍यक आहे. कोणत्याही कारणांसाठी नदीपात्र किंवा धरणाच्या पाण्यामध्ये प्रवेश करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.

नदीवरील अथवा ओढ्यावरील पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचे धाडस करु नये. जुन्या अथवा मोकडळीस आलेल्या घरांमध्ये, इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये घाटामध्ये दरड कोसळण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे सतर्कता बाळगावी. तसेच डोंगराळ भागातील घाट रस्त्याने प्रवास करण्याचे शक्‍यतो टाळण्याचे आवाहनही श्रीमती सिंघल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)