जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

सातारा,दि. 1 प्रतिनिधी- मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झालेला आहे. कोयना धरणात 105 टीएमसीक्षमतेपैकी 86.05 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झालेला आहे तर धोम धरणात 13.50 क्षमतेपैकी 11.20 टीएमसी, कण्हेर धरणात 10.10 क्षमतेपैकी 8.30 टीएमसी, भाटघर धरणात 23.75 क्षमतेपैकी 20.27 टीएमसी, नीरा देवधर धरणात 11.99 क्षमतेपैकी 10.19 टीएमसी, वीर धरणात 9.83 क्षमतेपैकी 9.39 टीएमसी, उरमोडी धरणात 9.80 क्षमतेपैकी 8.51 टीएमसी, धोम धरणात 4.08 क्षमतेपैकी 3.47 टीएमसी, तारळी धरणात 5.85 क्षमतपैकी 4.951 टीएमसी तर मोरणा गुरेघर धरणात 1.83 क्षमतेपैकी 0.922 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)