जिल्ह्यातील धरणक्षेत्रांत संततधार

पिंपळगाव जोगा धरणात पाणी येणास सुरुवात : काळू नदीची साडी, खणा नारळाने भरली ओटी

पुणे – जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. रविवारी धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांची पाणीपातळीत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जुन्नर तालुक्‍यातील पिंपळगाव जोगा धरणात पाणी येण्यास सुरुवात झाल्याने काळू नदी पात्राची नागरिकांनी साडी, खणा, नारळाने ओटी भरली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दि. 1 जूनपासून आजपर्यंत सर्वाधिक पाऊस हा टेमघर धरण परिसरात झाला असून याठिकाणी 561 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. त्याखालोखाल वडिवले धरण क्षेत्रात 451 मिमी, पानशेतमध्ये 388 मिमी, तर गुंजवणी धरण परिसरात 351 मिमी पाऊस झाला आहे. क्षयंदा राज्यात मान्सून उशिरा दाखल झाला. मागील तीन-चार दिवसांपासून ग्रामीण भागासह शहरातही संततधार सुरू आहे. जिल्ह्यात प्रमुख 24 धरणे असून या सर्व धरणांच्या

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाला मिळणारे ओढे-नाले वाहू लागले आहे. जलसंपदा विभागाकडून दि.1 जूनपासून धरण क्षेत्रातील पाऊस मोजण्यास सुरुवात होते. दि.1 जूनपासून आजपर्यंत डिंभे धरण परिसरात 199 मिमी, विसापूर धरण परिसरात 104 मिमी, कळमोडी-188 मिमी, चासकमान-114 मिमी, भामा-आसखेड-245 मिमी, आंद्रा धरण-266 मिमी, पवना धरण-303 मिमी, मुळशी-320 मिमी, वरसगाव-364, खडकवासला धरण परिसरात 234 मिमी, नीरा-देवघर-124 मिमी, तर नाझरे धरण क्षेत्रात 269 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)