सातारा, दि. 10 (प्रतिनिधी)
राज्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्तीने नुकत्याच बदल्या गृह विभागाने केल्या. यामध्ये जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर जिल्ह्याबाहेरील दोन अधिकारी जिल्ह्याला मिळाले आहेत.
जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यापुढे कंसात बदली झालेले ठिकाण. सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे ( सोलापूर ग्रामीण) सातारा शहर पोलीस ठाण्याचे श्रीकांत पोरे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची जि.सांगली), नियंत्रण कक्षातील बाळासाहेब भरणे (गडचिरोली) तळबीड पोलीस ठाण्याच्या वैशाली पाटील (गोंदीया) कराड शहरच्या पुष्पा किर्दत ( मुंबई शहर) बाळशिराम शिंदे (पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ) महेंद्र निंबाळकर ( मुबंई शहर) लोणंद पोलीस ठाण्याचे गिरीष दिघावकर (सीआयडी, पुणे) ज्योतीराम पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाणवीज) दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रवीण पाटील (सोलापूर ग्रामीण) येथे बदली झाली.
तसेच जिल्ह्यात नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे कंसात कोठून आले ते ठिकाण. नितीन माने यांची सांगलीहून जिल्हा जातपडताळणी कार्यालयात , मारूती सराटे यांची मुंबई शहरातून सातारा जिल्हा पोलीस दलात बदली झाली.