जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आरोग्यवर्धिनी होणार

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अग्रेसर : 539 केंद्रास मंजुरी

कुरवली- सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिकाधिक पोचविण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारली जात आहेत. पुणे जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेतून जिल्ह्यात यापूर्वी 30 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 25 उपकेंद्रे ही आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतरित झाली, मात्र या केंद्राचे सामान्य नागरिकांमध्ये असलेले महत्व लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांनी पाठपुरावा केला. त्यात यश आले. सरकारने आता संपूर्ण जिल्हाच म्हणजे 96 आरोग्य केंद्रे व 539 उपकेंद्रे ही आरोग्यवर्धिनी बनविण्यास मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमधून आरोग्याशी संबंधित 13 सेवा मोफत पुरवल्या जाणार आहेत. सरकारी दवाखान्यांमध्ये आरोग्य सुविधा बळकटीकरण तसेच केंद्रामध्ये रुग्णांना प्रतिबंधात्मक व उपचाराची सेवा देण्याबरोबरच प्रयोगशाळेतील तपासण्या व औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. दवाखान्यांमध्ये विशेषतः योगाशी संबंधित सल्ला, मार्गदर्शनही नव्याने मिळणार आहे. याचा समावेश या नव्या योजनेत केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने यांच्यासमवेत जिल्ह्याच्या आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकत्रित मोट बांधून आरोग्याच्या बाबतीत जिल्ह्याला राज्यात कायम आघाडीवर ठेवणाऱ्या आरोग्य सभापती माने यांच्या प्रयत्नाला आलेले हे आणखी एक मोठे यश आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये आरोग्य सुविधा बळकट करण्याचा तसेच केंद्रामध्ये रुग्णांना प्रतिबंधात्मक व उपचाराची सेवा देण्याबरोबरच प्रयोगशाळेतील तपासण्या व औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत.

  • जिल्ह्यात यापूर्वी 30 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 25 उपकेंद्रे मंजूर झाली होती. मात्र, जिल्ह्याची निकड व सामान्यांची गरज लक्षात घेऊन पाठपुरावा केला. आता जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे आरोग्यवर्धिनी होणार आहेत. इतरवेळी महागड्या आरोग्य सेवा सामान्यांच्या कक्षेत येतील. जिल्ह्यात दोन वर्षांत सुरू असलेली आरोग्याची विविध कामे निश्‍चितच मनाला समाधान देणारी आहेत. निवडलेल्या 30 प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे सुरू आहेत. काही आरोग्य केंद्रांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. लवकरच ही केंद्रे आयुष्यमान योजनेतील निकषानुसार परिपूर्ण केली जाणार आहेत. योजनेच्या माध्यमातून आरोग्याच्या मूलभूत सेवा आहेत. त्या सेवा रुग्णांपर्यंत अधिक परिणामकारकतेने पोचण्यास मदत होणार आहे.
    – प्रवीण माने, सभापती, जिल्हा परिषद.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)