जिल्ह्यातील आठ पतसंस्थांच्या व्यवहारांची चौकशी होणार

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे,- पुणे जिल्ह्यातील गैरव्यवहार झालेल्या आठ पतसंस्थांची चौकशी करुन ठेवीदारांना ठेवी परत करणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
यासंदर्भात आमदार विजय काळे यांनी प्रश्‍न विचारला होता.त्याला उत्तर देताना देशमुख म्हणाले,पतसंस्थातील अधिकारी व पदाधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये चौकशी करण्याचे आदेश देऊन ठेवीदारांच्या ठेवी सहा महिन्यात दोषी संचालकांची मालमत्ता जप्त करुन वसूल करण्याची कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील लेखापरिक्षण करण्यात आलेल्या सर्व पतसंस्थाच्या अहवालातून अनियमितता आढळणाऱ्या पतसंस्थांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन देशमुख यांनी सभागृहात दिले.
गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येणाऱ्या पतसंस्थांमध्ये विघ्नहर,आधार,कल्याण,अग्रेसन,लोकमंगल,भैरवनाथ,खडकमाळ,ओंकार यांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)