जिल्ह्यातील अठरा हवालदारांच्या खांद्यावर स्टार

शिपाई,नाईक,हवालदारांना पदोन्नती ;
प्रशांत जाधव : सातारा,दि.२४
सातारा जिल्हा पोलिस दलातील एकसष्ट कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती मिळाली आहे. पोलिस दलातील अठरा हवालदारांना सहाय्यक फौजदार म्हणुन बढती मिळाली आहे. पोलिस नाईकपदी काम करत असलेल्या  वीस कर्मचाऱ्यांना हवालदार म्हणुन तर पोलिस शिपाईपदी काम करत असलेल्या एकवीस कर्मचाऱ्यांना नाईक म्हणुन बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी काढले आहेत.

बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे बिपीन शिंदे, प्रदीप पाटणकर, कृष्णा गुरव, दत्तात्रय बुलुंगे, गणेश म्हेत्रस, शबीरखान मोकाशी,राजेंद्र थोरात नारायण मोहिते संजय भोईटे, अरविंद माने , धनाजी भोसले , राजाराम निकम, मदन फाळके, आयुब खान, उत्तम बर्गे , विजय जाधव, मंगल पटेल, कमल घाडगे यांना सहाय्यक फौजदारपदी बढती मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनोज शिंदे, संतोष पवार , राजेंद्र पगडे , संतोष शेलार , राजकुमार माने, विकास ढमाळ, नितीनकुमार नलवडे , विष्णू मर्डेकर , विजय माने, संजय साळुंखे, हिराचंद्र गुरव , प्रिया सपकाळ , पुष्पा पाटील, संतोष कदम, प्रतिभा कर्पे, रियाज शेख, प्रशांत शेवाळे, विजय फाळके, विलास ढमाळ, चंद्रकांत घाडगे यांना हवालदारपदी बढती मिळाली आहे.
दीपाली यादव , शशिकांत देशमुख, प्रवीण करांडे , सचिन साळुंखे, रहेनाबी शेख, सचिन गुरव , पूनम वाघ, सचिन शिंदे ,मेघा साळुंखे, संजय पोळ , विद्या साळुंखे, राजेंद्र जाधव, तुकाराम पवार , रामराव गायकवाड , बाबुराव यादव, सुनीलकुमार शिंदे , किशोरकुमार मिसाळ, गणेश कदम, मारुती अडागळे, किरण चव्हाण, सर्जेराव सूळ यांना पोलिस नाईकपदी बढती मिळाली आहे.

बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)