जिल्हा स्तरीय बुद्धीबळ निवड स्पर्धा-2018

उपनगर बुद्धीबळ संघटना आयोजीत स्पर्धेला महाराष्ट्र राज्य (ए.एम.सी.ए.) ची मान्यता
नगर – सदर स्पर्धेतून निवड प्राप्त खेळाडू आप-आपल्या वयोगटानुसार राज्य स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सदर स्पर्धा अधिकृत असल्याने पालकांनी व स्पर्धकांनी याची नोंद घेवून यात सहभाग घ्यावा असे आवाहन जेष्ठ खेळाडू व मार्गदर्शक सतिष शहा यांनी केले आहे.
स्पर्धा दोन दिवस चालणार असुन जागतिक बुद्धीबळ महासंघाच्या नियमावली नुसार होणार आहेत. स्पर्धा स्विस लीग पद्घतीने होणार आहे. इतर नियमावली व एकूण फेरी संख्या स्पर्धेच्या दिवशी कळविली जाईल.
स्पर्धा एकूण पाच गटात 7 वर्षे, 9वर्षे, 11वर्षे,13 वर्षे व 15वर्षाखालील गटातून खेळविल्या जातील. वर्षाखालील गटात मुले व मुलींची निवड केली जाणार असून उर्वरीत गटातून 2 मुले व 2 मुलींची निवड केली जाणार आहे. सर्व विजयी निवड प्राप्त खेळाडूंना प्रमाणपत्र व चषक देवून गौरवित करण्यात येणार असल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष रामराव पगार यांनी दिली आहे.
स्पर्धकांनी स्वतःचे बुद्धीबळ संच व चेस क्‍लॉक असल्यास आणून सहकार्य करावे असे आवाहन सुभाष दराडे यांनी केले आहे. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून राज्य बुद्धीबळ पंच गुरूजितसिंग गुंडु हे काम पाहणार आहेत.
संपूर्ण जिल्हाभरातून नाव नोंदणीनुसार उदंड प्रतिसाद मिळत असल्याने उत्साहाचे वातावरण पसरले आहे. नाव नोंदणी सुनिल घोडेरांव सुधिर नगरकर यांच्याकडे होईल. स्पर्धेच्या दिवशी सुद्घा सकाळी 10 पर्यंत चालू ठेवली जाईल सर्वच खेळाडूंचे स्पर्धेवर लक्ष लागले असल्याचे चित्र दिसत आहे. अशी माहिती हेमंत सुराणा यांनी दिली आहे.
सदर स्पर्धा ज्ञानेश्‍वर हॉल गायत्री मंदिराजवळ, महाजन गल्ली, अहमदनगर येथे शनिवार 19 मे व रविवार 20 मे रोजी सकाळी 10 वाजता होईल.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वश्री, हेमंत मराठे, लक्ष्मणराव मराठे, विनोद नागरगोजे, अतिज जाधव, चांगदेव पुजारी, अंबादास भोसले, शरफोद्दीन सय्यद, शिवराज परकाळे, मनोज भुजबळ , तुषार गट, बाबासाहेब गोरे, रमेश गुगळे, विलास जाधव , संजय जमदाडे, नितीन परदेशी , विकास परदेशी, विकास पारगांवकर, विजय पुरोहित, सचिन राठोड, सुभाष शिरसाठ, विनयक शिवरात्री, जितेंद्र तोरणे, देविदास येमुल, संजय सप्रे, रमेश देशमुख, अविनाश आनंदकर, डॉ. नंदकुमार आहे, मयुरेश धर्माधिरी इ. प्रयत्नशील आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)