जिल्हा शिक्षक पुरस्कार वाटपात वशिलेबाजी

पात्र शिक्षकांना डावलण्याने न्यायालयात जाणार : आढाव
भाविनिमगाव – जिल्हा परिषदेच्यावतीने दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप वशिलेबाजीने झाले असून पात्र शिक्षकांना डावलण्यात आले आहे, असा आरोप करून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या शेवगाव तालुक्‍यातील भायगावचे माजी सरपंच राजेंद्र आढाव यांनी या पुरस्काराच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
शिक्षक पुरस्कारात पात्र शिक्षकाला डावलण्यात आल्याने नाराजी व्यक्‍त करण्यात आली. इच्छुक शिक्षकांची माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असल्याने शेवगाव तालुक्‍यातील शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने एका शिक्षिकेला पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने शिक्षकामध्ये नाराजी पसरली आहे.
दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक तालुक्‍यातून एका शिक्षकाला शिक्षकदिनी आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. पुरस्कार देण्यासाठी इच्छुक शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले जातात. गुणदान पद्धतीचा अवलंब केला जात असला तरी तालुक्‍याच्या राजकारणाच्या दृष्टीकोणातून वशिल्यावर पुरस्कार दिला असल्याचा आरोप केला आहे. यावर्षीचा शेवगाव तालुक्‍याचा शिक्षक पुरस्कार प्रशासनाकडून काल यादी जाहीर करण्यात आली. पात्र शिक्षिकेला डावलण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात भायगावचे माजी सरपंच आढाव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकरात अर्ज केला असून सोशल मीडियावर व प्रशासनाने घोषित करण्यात आलेल्या शिक्षिकेची व पात्र ठरत असलेल्या शिक्षिकेची गुणदान माहिती मागविण्यात आली असल्याने शेवगाव तालुक्‍याचा शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. वशिल्यावर शेवगाव तालुक्‍याचा पुरस्कार दिला गेल्याने न्यायालयाचा दरवाजा थोटावून खऱ्या पात्र शिक्षकेला आदर्श शिक्षक म्हणून न्याय मिळवून देवू. न्यायालयात न्याय मागविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. त्यासाठीच माहिती अधिकारात माहिती मागितली आहे, असे आढाव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)