पुणे – जिल्हा परिषद शिक्षण विभागाने “जिल्हा शिक्षक पुरस्कारा’चे वितरण झाले. मात्र, यात गोलमाल झाला आहे. यावर्षी आदिवासी भागातील शिक्षकांना पुरस्कारातून वगळले आहे. तर, दुसऱ्या शाळेतील शिष्यवृत्तीचे विद्यार्थी स्वत:च्या नावावर दाखवून शिक्षक पुरस्कार दिला जातो, हा कोणता न्याय आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी “जिल्हा शिक्षक पुरस्कारा’ची पोलखोल केली. त्यामुळे सभागृहातही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

आशा बुचके म्हणाल्या, आदिवासी भागातील शिक्षक पुरस्करांच्या संदर्भात सीईओंना सांगूनदेखील त्याचा विचार झाला नाही. यावर्षी आदिवासी भागाला डावलून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. तर, दुसरीकडे शिष्यवृत्ती परीक्षेत केवळ एकच विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असताना इतर शिक्षकाचे विद्यार्थी स्वतःचे असल्याचे सांगून प्रशासनाची दिशाभूल करत आंबेगावमधील मोरडेवाडी शाळेतील शिक्षकाने पुरस्कार मिळवला आहे, असा आरोपही बुचके यांनी केला.

ज्या शिक्षकाला पुरस्कार देण्यात आला आहे, त्याला यापूर्वी 2010 मध्ये एकदा निलंबीत करण्यात आले होते. त्यामुळे हा “वाल्याचा वालमीकी’ कधी आणि कशा झाला असा टोमणा बुचके यांनी शिक्षण विभागाला मारत, अधिकाऱ्यांशी संगणमत करत अफरातफर करून त्याला पुरस्कार देऊन त्याची प्रतिमाच उजळवली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)