जिल्हा विभाजनाचा विषय एैरणीवर

दक्षिणेत 8 तर उत्तरेत 6 तालुके
2012 च्या प्रस्तावावरून उत्तर-दक्षिण असे दोन जिल्हे व्हावे, यासाठी विभागीय आयुक्ताकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दक्षिणेत नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व राहुरी असे एकूण 8 तालुके आहे तर उत्तरेत-कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, अकोले व संगमनेर असे एकूण 6 तालुके असून, मुख्यालय कोठे असावे यासाठी शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर यापैकी एक ठिकाण जिल्हाचे ठिकाण म्हणून उपलब्ध होऊ शकते.

जिल्हा निर्मितीची 90 च्या दशकापासून मागणी : परिसरातील जनमताचाही रेटा

नगर – प्रशासनाचे कामकाज अधिक गतीने होऊन नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, या हेतूने राज्यात जिल्हा विभाजन करून नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या मागे त्या परिसरातील जनमताचा रेटाही होताच. या पार्श्‍वभूमीवर भौगोलिकदृष्ट्या विस्तृत असणाऱ्या नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी 90 च्या दशकापासून पुढे येत आहे. शिर्डी दोऱ्यात पालकमंत्री राम शिंदे यांनी या मुद्दयावर भाष्य केल्याने जिल्हा विभाजनाचा विषय एैरणीवर आल्याचे स्पष्ट होत आहे.

500 कोटींचा प्रस्ताव
शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर येथे 2012 च्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकरिता प्रशासकीय इमारत बांघकाम करण्याकरिता व जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्‍यक 60 कार्यालयाकरिता शासकीय जमीन उपलब्ध होणार नाही. सर्व कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी जमीन संपादित करावी लागणार आहे. इमारत बांधकामाचा अंदाजित खर्च 500 कोटी प्रस्तावित केला आहे.

-Ads-

प्रशासनाच्या कामकाजात सुविधा आणि स्थानिक जनतेच्या दृष्टीने दैनंदिन कामकाजातला त्रास कमी व्हावा, म्हणून जिल्हा विभाजनाचा कल्पना पुढे आली. नगर जिल्ह्याचा अफाट भौगोलिक विस्तार आणि जिल्हा मुख्यालयापासून अनेक गावांपासून लांब असणारे अंतर या अनुषंगाने नगर जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर, दक्षिण असे दोन जिल्हे व्हावे, अशी मागणी पुढे आली. 1993 च्या सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सोनई दौऱ्यात यावर भाष्य केले. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून राज्यात अनेकदा सत्तांतर झाले. अद्यापही हा प्रश्‍न धसाला लागला नाही. 24 जून 2014 मध्ये जिल्हा विभाजनाचे निकष ठरविण्यासाठी जिल्हा पुनर्रचनाची अपर महसूल मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत करण्यात आली. त्यातच नुकत्याच असिस्टंट इंजिनियरच्या महावितरण अधिवेशानात पालकमंत्री राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकी अगोदर जिल्ह्याची निर्मिती होईल, असे भाष्य केल्याने जिल्ह्याचा विषय एैरणीवर आला आहे.

जिल्हा पुनर्रचना समितीने 2014 पासून ते 26 जून 2015 पर्यंत जिल्ह्यातील गावांची संख्या, जिल्ह्यामधील तालुक्‍यामध्ये असलेल्या गावांची सरासरी संख्या, जिल्हा मुख्यालयाचे अंतर, जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दूरचा तालुका, जिल्हास्तरीय कार्यालयांची संख्या आदी अनेक मुद्दयांची महसूल विभागाला 26 जून 2015 पर्यंत या समितीकडून माहिती मागवली आहे.

लोकसभा, विधानसभा मतदार संघ
जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी हे दोन लोकसभा मतदार संघ आहेत तर विधानसभा मतदार संघात अहमदनगर-शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत तर शिर्डी- अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा तालुके आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)