जिल्हा विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नवा मार्ग शोधा

गडचिरोली : देशातील निवडक जिल्हयात गडचिरोली जिल्हा सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडला आहे. अपेक्षित विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी पारंपरिक पद्धतीने कामे न करता नव्या मार्गाने गतिमान पद्धतीने काम करावे लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.

पंतप्रधान आकांक्षित जिल्हा योजना अंतर्गत गडचिरोलीची निवड आली आहे. या कालबध्द कार्यक्रमास १ एप्रिल २०१८ पासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

देशात एकावेळी १०१ जिल्ह‌यात हा कालबध्द विकास कार्यक्रम सुरु होत आहे. त्यात गडचिरोलीचा समावेश आहे. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री देखील यात विशेष लक्ष देतील असे सांगून अहिर म्हणाले की, जिल्हयातील अधिकाऱ्यांनी विकासाची दृष्टी ठेऊन काम करावे यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)