जिल्हा रुग्णालयात होणार आयुर्वेदसह युनानी, होमिओपॅथी उपचार

सातारा – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आयुष रूग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तो मंजुर झाल्यावर आयुर्वेद, युनानी, व होमिओपॅथी उपचारांचा फायदा नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे.

प्राचीन उपचार पध्दतींच्या प्रसाराचा एक भाग म्हणून शासनाने आयुष विभागाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे ऍलोपॅथीबरोबरच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचारांची सुविधा रूग्णांना शासकीय रूग्णालयात उपलब्ध होते.केवळ केस पेपरच्या शुल्कात नागरिकांना या सुविधा मिळायला यामुळे सुरूवात झाली. या उपचार पध्दतीचे बाह्यरूग्ण विभाग सुरू झाल्यापासून आजवर हजारो रूग्णांनी याचा लाभ घेतला आहे. आयुष विभाग सुरू असला तरी ज्या आजारांच्या उपचारासाठी आयुर्वेद व युनानी उपचारपध्दतीत दाखल करून घ्यावे लागते. त्यासाठी स्वतंत्र आयुष रूग्णालयाच्या सुसज्ज इमारतीची आवश्‍यकता आहे.

-Ads-

जिल्हा रूग्णालयाच्या सध्याच्या जागेत ते करता येऊ शकेल काय, याबाबतची माहिती बांधकाम विभागाकडून घेण्याचे डॉ. गडीकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. जागा उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाल्यावर हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे. प्रायोगित तत्वावर राज्यातील पाच ठिकाणी अशा रूग्णालयांना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश नाही. परंतु जिल्ह्यातील नागरिकांनाही ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी डॉ. गडीकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

नुकतीच आयुष मंत्र्यांनी जिल्ह्यात भेट दिली. या भेटी वेळी त्यांनी आयुष रूग्णालयाचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये स्वतंत्र आयुष रूग्णालय उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. स्वतंत्र आयुष रूग्णालय झाल्यास पुरूष व स्त्रियांसाठी स्वतंत्र पंचकर्मासाठी खोली, योगी हॉल, सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष, डिस्पेन्सरी, स्टोअर रूम उपलब्ध होतील. पॅरिलिसीस, संधिवात, कावीळ, त्वचारोग, आम्लपित्त यांसारख्या आजारांच्या रूग्णांना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)