प्रशासनाच्या दुर्लक्षाने रुग्णांचे हाल
गुरुनाथ जाधव
सातारा- क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात लिफ्ट बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा रुग्णालयात लिफ्ट अचानक बंद पडून रुग्ण अडकल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मुळात या लिफ्टचा ठेका कोणत्या कंपनीला दिला आहे, त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नक्की कोणाची याची उत्तरे शोधण्याची गरज आहे.

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रुग्णालयात गैरसोईमुळे अनेक रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. लिफ्ट बंद असल्याने गंभीर आजारी रुग्णांवर विहित वेळेत उपचार न झाल्यास रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकाच्या रोषास सामोरे जावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयाचे विजतंत्री वाय एस. पाटील यांनी दिनांक 22 ऑगस्ट 2018 रोजी लिफ्ट अचानकपणे बंद पडली असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर याना अर्जाद्वारे दिली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्यूत उपअभियंतांना जिल्हा रुग्णालयात अत्यावश्‍यक सेवा देणारी लिफ्ट बंद पडली आहे,त्याची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची विनंती केली. याबाबतचे लेखी पत्र देऊन देखील गेले 20 दिवस याबाबत कोणत्याही स्वरूपात कारवाई झाली नसल्याने जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विद्यूत विभागाच्या अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा रुग्णालयात लिफ्ट मन नाही. त्यामुळे लिफ्ट वारंवार बिघडते असे सांगितले. जिल्हा रुग्णालयातील विजतंत्री पाटील म्हणाले हा विषय वरिष्ठांच्या अखत्यारीतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)