जिल्हा रुग्णालयात आत्महत्येचा थरार

सातारा ः आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जखमी संशयिताला नेताना पोलीस.

प्रिझन कक्षातच घेतले गुप्तांग कापून; उपचारासाठी आयसीयू मध्ये दाखल

सातारा,दि.30(प्रतिनिधी) -सातारा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. फिट्‌सचा त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. आभ्या उर्फ निलेश पितांबर काळे( रा.तासगाव,ता.सातारा) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. तो अत्याचाराच्या गुन्ह्यात सातारा कारागृहात आहे. शिंदे याला तीन महिन्यांपुर्वी एका गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. अटकेतील शिंदेची नंतरच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.तेव्हापासून तो सातारा कारागृहात आहे. गुरूवारी फिटस्‌चा त्रास होवू लागल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . शनिवारी (दि. 29) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शिंदे प्रिझन वॉर्डमध्ये असणाऱ्या शौचालयाच्या खिडकीची काच फोडली. फोडलेल्या काचेनेच त्याने स्वत:चे गुंप्तांग कापून घेतले. शिंदेने आत्महतेचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच बंदोबस्तावरील पोलिसांनी डॉक्‍टरांना माहिती दिली. त्यानंतर शिंदे याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)