जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा : पृथा वर्टीकरला दुहेरी मुकुटाचा मान 

पुणे – गुणवान खेळाडू पृथा वर्टीकरने दुहेरी मुकुट संपादन करताना दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचा कालचा दिवस गाजविला. पृथाने वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना 15 आणि 21 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपद पटकावीत दुहेरी मुकुटाची निश्‍चिती केली. रॅडियंट स्पोर्टस ऍकॅडमी आणि टेबल टेनिस प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा सन्मित्र संघ येथे सुरू आहे. स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत अग्रमानांकित पृथाने दुसऱ्या मानांकित अनीहा डिसूझावर 11-6, 8-11, 11-2, 9-11, 11-6 अशी संघर्षपूर्ण मात केली. ही लढत शेवटपर्यंत चुरशीची झाली. चार गेमनंतर लढत 2-2 अशी बरोबरीत होती. निर्णायक गेममध्ये पृथाने अनीहाविरुद्ध सरस खेळ करून बाजी मारली. तत्पूर्वी, उपान्त्य फेरीत पृथाने चतुर्थ मानांकित मयूरी ठोंबरेवर 11-7, 11-2, 17-15 अशी मात केली होती. तर अनीहाने तृतीय मानांकित मृण्मयी राईखेलकरवर 11-7, 9-11, 11-5, 11-7 असा विजय मिळवला होता.

यानंतर 21 वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित पृथाने अग्रमानांकित ईशा जोशीवर 11-5, 11-8, 11-8, 2-11, 11-4 अशी सनसनाटी मात करताना विजेतेपद मिळवले. तत्पूर्वी उपान्त्य फेरीत ईशाने पाचव्या मानांकित स्वप्नाली नरळेवर 11-8, 11-2, 11-4, 11-8 असा, तर पृथाने दुसऱ्या मानांकित सलोनी शहावर 11-7, 11-9, 11-6, 10-12, 11-5 असा विजय मिळवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंधरा वर्षांखालील मुलांच्या उपान्त्यपूर्व फेरीतील सामन्यांत अनेय कोवेलामुडीने आदित्यवर्धन त्रिमलचा 11-5, 11-5, 11-3 असा सरळ पराभव करत उपान्त्य फेरी गाठली. तर दुसऱ्या सामन्यात आदी फ्रॅंक अगरवालने भार्गव चक्रदेवचा 11-5, 11-7, 11-8 असा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. आदित्य जोरीने सनत जैनचा 8-11, 7-11, 11-5, 12-10, 11-7 असा संघर्षपूर्ण पराभव करत उपान्त्य फेरी गाठली. तर अर्चन आपटेने नील मुळ्येचा 11-9, 11-4, 11-7 असा सहज पराभव करत उपान्त्य फेरीत धडक मारली. प्रौढांच्या गटातील उपान्त्य फेरीत नितीन मेहेंदळेने पराग पसरणीकरचा 11-8, 11-4, 7-11, 5-11, 11-1 असा संघर्षपूर्ण पराभव करताना अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी त्यांच्यासमोर दीपेश अभ्यंकरचे आव्हान आहे. दुसऱ्या उपान्त्य सामन्यात दीपेश अभ्यंकरने शेखर काळेचा 11-7, 11-9, 11-9 असा सरळ गेममध्ये पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

सविस्तर निकाल – 
18 वर्षांखालील मुले – उप-उपान्त्यपूर्व फेरी – शौनक शिंदे वि. वि. आदित करंदीकर 7-11, 11-7, 11-7, 11-7; मिहिर ठोंबरे वि. वि. अर्चन आपटे 11-5, 11-4, 11-4; अनेय कोवेलामुडी वि. वि. आर्यन पानसे 11-5, 3-11, 11-6, 15-13; आदर्श गोपाळ वि. वि. आदी फ्रॅंक आगरवाल 11-5, 11-6, 11-8; श्रीयश भोसले वि. वि. वसू अगरवाल 11-6, 11-2, 10-12, 11-9; आरुष गलपल्ली वि. वि. रोहित गोगटे 11-9, 11-7, 11-1; नील मुळ्ये वि. वि. साई बगाटे 11-5, 12-10, 9-11, 11-13, 11-7; करण कुकरेजा वि. वि. जय पेंडसे 11-6, 11-7, 11-5.
21 वर्षांखालील मुले – उप-उपान्त्यपूर्व फेरी -अद्वैत ब्रह्मे वि.वि शौनक शिंदे 11-9, 8-11, 13-11, 11-5, श्रीयांश भोसले वि.वि. आकाश दास 11-5, 11-4, 11-6, राज शिंदे वि.वि. रजत कदम 11-8, 13-11, 11-9, आदित्य पाटील वि.वि. आर्यन सेठ 11-8, 11-8, 12-10, आदर्श गोपाल वि.वि. अभिशेक बाजपेई 11-3, 12-10, 11-7, आरुश गळपल्ली वि.वि. 11-5, 12-10, 11-9, मिहिर ठोंबरे वि.वि. दानिश आगा 11-5, 11-1, 11-6, सनत बोकील वि.वि. शिशिर लंके 11-7, 11-3, 11-9.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)