जिल्हा महिला सरचिटणीसपदी प्रियतमा दासगुडे

पिरंगुट- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रियतमा दसगुडे यांची पुणे जिल्हा महिला सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. राज्याध्यक्ष उदय शिंदे व पुणे जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर यांच्या हस्ते नियुक्‍ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सरचिटणीस विजय कोंबे, राज्य नेते काळुजी बोरसे, शिवाजीराव साखरे, नाना जोशी, महादेव माळवदकर, उपाध्यक्ष सचिन हंगरगे, राजेश ढोबळे, मानसिंग वाकडे, मुळशी अध्यक्ष संदीप दुर्गे, वंदना कोल्हे, किशोर बेलदार, कुंडलिक कांबळे, धनंजय सावंत, सदानंद चौधरी, परमेश्‍वर जाधव, राजेंद्र परहार, विनोद उबाळे, यासीन शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. महिलांचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करेन असे प्रियतमा दसगुडे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)