जिल्हा बॅंक सर्वसामान्यांची बॅंक : पानस्कर

ढेबेवाडी – सातारा जिल्हा सहकारी बॅंक ही शेतकरी व सर्व सामान्य जनतेची आपली बॅंक असून सर्वाना आपुलकीची सेवा देणारी आहे. त्यामुळेच सातारा जिल्हा बॅंकेला सातारा जिल्ह्याची आर्थवाहीनी म्हटले जाते, असे प्रतिपादन पाटण तालुका विभागीय विकास अधिकारी एस. आर. पानस्कर यांनी केले. ढेबेवाडी ता. पाटण येथील शाखेस 58 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित ठेव वाढ व कर्ज वाढ मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी शाखाप्रमुख पी. टी. धस, विकास अधिकारी डी. टी. पाटील, आर. आर. मोरे, बी. आर. दुधडे, ए. ए. नलवडे, पी. आर. साळुंखे, पी. एस. पवार, दीपक कचरे, प्रमोद पाटील, सतिश ढेब, संजय पाचुपते, संजय पाटील, हणमंत नलवडे, भीमराव पवार, महेश पाटील उपस्थित होते. यावेळी पानस्कर म्हणाले, बॅंकेच्या प्रगतीमध्ये सर्व ठेवीदार, सभासद, कर्जदार आणि हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या सर्वांच्या विश्वासामुळे बॅंकेने नाबार्डचे विविध पुरस्कार मिळवले आहेत. यावेळी ढेबेवाडी शाखेस 58 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्यनारायण पुजेचे आयोजन केले होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाखाप्रमुख पी. टी. धस यांनी केले. प्रास्ताविक विकास अधिकारी डी. टी. पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार विकास अधिकारी आर. आर. मोरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदार व हितचिंतक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)