जिल्हा बॅंकेमार्फत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान..

म्हासुर्णे- आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या म्हासुर्णे, ता. खटाव शाखेमार्फत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाखाधिकारी सुनिल भाग्यवंत म्हणाले, जिल्हा बॅंकेने ज्येष्ठांसाठी त्यांच्या ठेवीवर एक टक्का जास्त व्याज दराची सवलत राज्यात सर्व प्रथम जिल्हा बॅंकेने सुरू केली. त्याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक ज्येष्ठांचा नेहमीच आदरभाव व्यक्त करुन त्यांना प्रेरणा व आपुलकीची सेवा देत असते. ज्येष्ठ नागरिक हे समाजातील महत्त्वाचे घटक असून सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले.

-Ads-

यावेळी चंद्रकांत शहा, बबन जंगम, गोरख पवार, शंकर डोळ, हरिदास तुपे, पांडुरंग सुतार, आत्माराम सरकाळे, रमजान तांबोळी, शांताराम कुलकर्णी, दस्तगीर मुल्ला, माधव इनामदार, यमगर, पाटील, ज्येष्ठ नागरिक व खातेदार उपस्थित होते. स्वागत शाखाप्रमुख सुनिल भाग्यवंत, कॅशिअर पवार, बॅंकेचे कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)