जिल्हा बॅंकेच्या पाबळ शाखेत शाखाधिकाऱ्यांचा सन्मान

पाबळ- येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे शाखाधिकारी काळे डी. बी. यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार, विविध भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विभागीय अधिकारी आर. एस. टेमगिरे, करंदी शाखेचे विकास अधिकारी डी. पी. ढमढेरे, पाबळ शाखेचे विकास अधिकारी एल. के. भंडारे, पाबळ सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, संचालक, शाखा अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठनेते परमेश्वर चौधरी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी वर्गास 65 कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती देऊन काळे यांनी केलेल्या सहकर्याबद्दल आभार मानण्यात आले. तर पाबळ येथील खातेदार, संस्था पदाधिकारी आणि शाखा कर्मचारी यांच्या सहकार्य आणि प्रेमामुळे उत्तम काम करण्यात यशस्वी झाल्याची माहिती देऊन उपस्थितांचे डी. बी. काळे यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)