जिल्हा बॅंकेच्या खातेदारांना मनस्ताप

नारायणगाव शाखा शुक्रवारी राहणार बंद ः पूर्वसूचना न दिल्याचा आरोप

नारायणगाव-पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची नारायणगाव शाखा आज (शुक्रवारी) खातेदारांना पूर्वसूचना न देता अचानक बंद असल्याने अनेक खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हा बॅंक प्रशासनाने नारायणगाव शाखा दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी बंद ठेवून शनिवारी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नारायणगाव शाखेत यापुढे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती बॅंकेचे शाखा प्रमुख सुभाष डोके यांनी दिली.
जिल्हा बॅंकेच्या मुख्य प्रशासनाने बदल केलेली माहिती खातेदार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व सभासदांना नसल्याने अनेक जणांना पुन्हा माघारी जावे लागले. या निर्णयामुळे जास्त त्रास हा खातेदारांना होणार आहे. राष्ट्रीय बॅंका, सहकारी बॅंका, पतसंस्था दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद असतात. पण जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नारायणगाव शाखेने शनिवारी बॅंक सुरु ठेवल्याने खातेदारांना अनेक अडचणींना सामोरे जाऊन खातेदारांना आर्थिक दंड व मनस्ताप सहन करावा लागणार आहे. गुरुवारी खातेदाराने जिल्हा बॅंकेत चेक भरल्यास तो क्‍लिअरिंगला शुक्रवारी शाखा बंद असल्याने शनिवारी जाणार. पण इतर बॅंक ह्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद असल्याने चेक क्‍लिअरिंगला थेट सोमवारी जाणार व खातेदाराच्या अकाउंटला ते सोमवारी दुपारी 4 चारनंतर जमा होणार. तोपर्यंत खातेदाराला चेकची रक्कम मिळण्यासाठी 5 दिवस लागणार आहेत. तसेच जिल्हा बॅंकेचा चेक इतर बॅंकेत क्‍लिअरिंगला आल्यास शाखा शुक्रवारी बंद असल्याने क्‍लिअरिंगसाठी येणारे चेक संबंधित बॅंकेने रिटर्न केल्यास तो होणारा दंड खातेदारांना नाहक सहन करावा लागणार आहे. नारायणगावातील बहुतेक पतसंस्था व सहकारी बॅंकेची आर्थिक उलाढाल जिल्हा बॅंकेत असल्याने त्यांच्याही कामकाजावर परिणाम होणार आहे. सभासदांनी मागणी केली आहे की, प्रशासनाने हा निर्णय बदलून पुन्हा जैसे थे कामकाज सुरु ठेवावे.
या संदर्भात बॅंकेच्या खातेदार सुमन साळुंके, अनिल साळुंके, ज. मा. मुंढे, विना खांडगे, सु. का. तांबे, विनायक वाणी आदींनी सांगितले की, नारायणगाव शाखेतून आम्हाला बॅंकेने केलेला कामकाजातील बदलाची माहिती दिली नाही. त्यामुळे आम्हाला आज बॅंक बंद असल्याची माहिती नव्हती. बॅंकेने आज केलेला बदल चुकीचा आहे. ज्या गावातील आठवडे बाजार असतो त्याठिकाणी फक्त जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सभासदच जातात का? बाकीच्या बॅंकेचे सभासदही बाजारात जातात. त्यांनी बदल नाही केला. बदल करायचा असेल तर गावातील सर्व बॅंकांनी करावा. बदल केलेला निर्णयाची नोटीस सूचना फलकावर व गेटवर सुद्धा बॅंकेने लावलेला नव्हती.

  • काही सभासदांची वार्षिक मिटिंगमध्ये मागणी होती की, ज्या गावचा आठवडे बाजार असेल त्या दिवशी जिल्हा बॅंकेची शाखा सुरू ठेवावी. त्यानुसार नारायणगावचा बाजार शनिवारी असल्याने बदल केलेला आहे. नारायणगाव शाखेत बदल केल्यामुळे कामकाज करण्यास अडचण येत असल्यास सभासदांशी विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येईल.
    -ऍड. संजय काळे, संचालक जिल्हा बॅंक 

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)