जिल्हा बॅंकेची अरणगाव शाखा फोडण्याचा प्रयत्न

सायरन वाजल्याने चोरटे फरार; जामखेडमध्ये मात्र चोरी

जामखेड – तालुक्‍यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची अरणगाव येथील शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला; मात्र बॅंकेचा सायरन वाजल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. दुसऱ्या घटनेत त्याच दिवशी जामखेड येथील नगर रस्त्यावरील बिअर शॉपीच्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरटयांनी 74 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अरणगाव येथे नगर जिल्हा सहकारी बॅंकेची शाखा आहे. 30 तारखेला सायंकाळी बॅंकेचे कामकाज संपल्यानंतर बॅंकेचे व्यवस्थापक व अन्य कर्मचारी बॅंक बंद करून घरी गेले. 31 तारखेच्या पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी बॅंकेच्या समोरील बाजूच्या शटरचे कुलूप तोडून समोर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले. चोरट्यांनी आत जाऊन बॅंकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र याच दरम्यान बॅंकेचा सायरन मोठ्याने वाजला. त्यामुळे चोरटयांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. सायरन वाजल्याने आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांना जाग आली. त्यांनी बॅंकेकडे धाव घेतली असता चोरटयांनी बॅंक फोडल्याचे लक्षात आले. या प्रकरणी बॅंकेचे व्यवस्थापक पंडित रंगनाथ सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत जामखेड शहरातील नगर रस्त्यावरील युवराज पोकळे यांच्या राज बिअर शॉपीचे शटर उचकटून 74 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. 31 तारखेला पहाटे ही घटना घडली. पहाटे पावणेचारच्या सुमारास अज्ञात चार चोरटयांनी चारचाकी गाडीने येऊन ही चोरी केली. जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भागवत हे करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)