जिल्हा बॅंकेकडून शेतकरी हिताला प्राधान्य -थोरात

जुन्नर  -पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बॅंक आहे. बॅंकेने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देऊन शेतकरीहिताचे निर्णय घेतले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केले.
जिल्हा बॅंकेच्या शतकपूर्ती कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी थोरात जुन्नर येथे आले होते. याप्रसंगी उपस्थित सहकारी सेवा सोसायटी, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करतांना थोरात बोलत होते. यावेळी थोरात म्हणाले, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या या जिल्हा बॅंक व शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा असून विकास सोसायट्यांचे योगदान जिल्हा बॅंकेच्या प्रगतीमध्ये महत्वाचे आहे. शंभर वर्षांच्या वाटचालीमध्ये बॅंकेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंचावला असून सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक म्हणून आशिया खंडात बॅंकेचा नावलौकिक आहे. बॅंकेचे माजी उपाध्यक्ष व बाजारसमितीचे सभापती ऍड संजय काळे म्हणाले, पुणे जिल्ह्यात कर्जवाटप व कर्जवसुली याबाबतीत जुन्नर तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जुन्नर तालुक्‍यातील सतरा शाखांमधून व 76 विकास सोसाट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार व जलदगतीने सुविधा देण्याचा प्रयत्न बॅंक अधिकारी, कर्मचारी व सोसायटी सचिव यांचा राहिला आहे. बॅंकेच्या शतक महोत्सवास तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणावर सहकार क्षेत्रातील नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास ऍड. काळे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, बॅंकेचे संचालक तुळशीराम भोईर, बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजणे, रंगनाथ घोलप, सुमन बोऱ्हाडे, जिल्हा बॅंकेच्या सेवकांच्या पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुभाष कवडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोक बढे, दशरथ पवार, सिताराम खिलारी, जिल्हा बॅंकेचे विभागीय अधिकारी बापू पारधी, बाळासाहेब मुरादे, संजीव गोसावी, सुभाष डोके, सुनील ताजणे यांसह विकास सोसायट्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पंच कमिटी सदस्य, सचिव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुभाष कवडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)