जिल्हा बँकेकडून ज्येष्ठांचा सत्कार

ओझर्डे : जिल्हा बॅंकेच्यावतीने जेष्ठ नागरिकांचा सत्कार करताना पुरुषोत्तम डेरे समवेत इतर मान्यवर. (छाया : करुणा पोळ)

कवठे, 3 (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ओझर्डे (ता. वाई) शाखेच्यावतीने गावातील जेष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हा बॅंकेच्या ओझर्डे शाखेच्यावतीने जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाखाप्रमुख पुरुषोत्तम डेरे म्हणाले, जिल्हा बॅंकेने जेष्ठांसाठी त्यांच्या ठेवीवर 1 टक्के जादा व्याजदराची सवलत राज्यात सर्वप्रथम सुरु केली. त्याचा लाभ जेष्ठांनी घ्यावा, असे अवाहन केले. बॅंक जेष्ठांप्रती नेहमीच आदरभाव व्यक्त करुन त्यांना प्रेमाची व आपुलकीची सेवा देत असते. जेष्ठ नागरिक हे समाजातील महत्वाचे घटक असून सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे सांगितले.
यावेळी लालासाहेब पिसाळ, उदयसिंह पिसाळ, बाळासाहेब पाटील, शंकरराव पवार, विठ्ठल पोळ, अरविंद गुरव, रामचंद्र पिसाळ, अरविंद तांगडे, बाळासो निंबाळकर, हणमंत क्षीरसागर, चंद्रकांत कदम, शामराव भिसे, शकुंतला जाधव, सुभद्रा टिके, जनार्दन मांढरे, पांडूरंग निकम, वसंतराव पिसाळ, बाबासाहेब पिसाळ, हणमंत जाधव, जयवंत वाघ, दत्तात्रय जायमाळी, सोपानराव मोरे, मालोजीराव निकम, नानासाहेब कांबळे आदी जेष्ठ नागरीक तसेच खातेदार उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत शाखाप्रमुख पुरुषोत्तम डेरे, संदिप चव्हाण, स्वप्निल शेडगे, हरिश्‍चंद्र जाधव यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)