जिल्हा पोलीस दलाच्यावतीने महारक्‍तदान शिबिर

सातारा- सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित महारक्‍तदान शिबिरास गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 300 जणांनी रक्‍त दान करत सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख व पोलीस उपअधिक्षक गजानन राजमाने यांच्या पुढाकाराने या रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय व इतर स्वयंसेवी संस्था यांच्या संयुकत सहकार्याने येथील अलंकार हॉल पोलीस करमणूक केंद्र येथे रक्तदान शिबिरासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. सकाळी दहा वाजता या शिबिराचे उद्‌घाटन पंकज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाविषयी बोलताना देशमुख म्हणाले यंदा गणेशोत्सव व मोहरम दोन्ही सण एकत्र आले असून सामाजिक सौहार्द ता जपणे आवश्‍यक आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. सातारा जिल्हा हा शूरवीर जवानांचा जिल्हा आहे. सीमेवर रक्‍त सांडणाऱ्या जवानांसाठी ही बांधिलकी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्तदानातून ती व्यक्त होते. त्यासाठी प्रत्येकाने अवश्‍य रक्तदान करावे असे आवाहन पंकज देशमुख यांनी केले. या उपक्रमाच्या नियोजनाबद्दल गजानन राजमाने यांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले. या महारक्‍तदान शिबिरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल तीनशे बाटल्या रक्‍त जमा झाले. जिल्हा पोलीस दलाचे जवान व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यानी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)