जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांच्या प्रयत्नातून भजन साहित्याचे वाटप

टाकवे बुद्रुक – ग्रामीण भागातील भजनी मंडळांना पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा सुदामराव कदम यांचे फंडातून टाकवे-वडेश्‍वर मतदार संघातील बोरवली, सुदुंबरे, कदमवाडी, खांडी व फळणे या गावातील भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये पेटी, पखवाद, वीणा व 10 टाळ अशा साहित्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक गावातील काकडा आरती सप्ताहच्या वेळी प्रत्येक गावात जाऊन हे साहित्य वाटप करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, ज्येष्ठ नेते बाजीराव गाडे, संघटन मंत्री नारायण ठाकर, उद्योजक तुषार भेगडे, सरपंच वर्षा गाडे, टाकवे सरपंच सुप्रिया मालपोटे, सरपंच प्रतीमा शेलार, उपसरपंच जालिंदर गाडे, सरचिटणीस सुदाम कदम, नामदेव शेलार, राघुजी तळपे, छगन लष्करी, कैलास खांडभोर व ग्रामस्थ उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)