जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी

राजगुरूनगर- जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुधार सामंजस्य करार राजगुरुनगर येथे पार पडला. यावेळी 14 कोटी रुपयांचा निधी जानिकीदेवी बजाज कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आला असून या करारावर जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी सह्या केल्या असल्याने आता जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी प्राप्त होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, अतुल देशमुख बाबाजी काळे, निर्मला पानसरे, खेडच्या सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, माजी सभापती सुरेश शिंदे,अंकुश राक्षे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, बजाज कंपनीचे जनरल मॅनेजर (सामाजिक दायित्व) पंकज वल्लभ, संचालक निवृत्त कर्नल व्ही. जी. देशमुख, प्रभारी संचालक एस. के. पांडे, अनिल भंडारे, सहायक व्यवस्थापक सचिन उपाध्ये, वरिष्ठ प्रकल्पाधिकारी राजेश उफाडे, मीना हिंगे, बाळासाहेब ठोंबरे, विनायक गोरडे, संदीप जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री दोंदे, जीवन कोकणे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
सी. पी. त्रिपाठी म्हणाले की, एक दुसऱ्यावर बोटे करण्यापेक्षा दोघांनी एकत्र काम केल्यास त्याला यश येते. आम्ही निधी दिला त्यातून शाळा इमारती उभ्या राहतील मात्र, त्याला महत्त्व नसून त्यामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व ज्ञान मिळणे गरजचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपापली जबाबदारी सांभाळणे गरजेचे आहे. देशात पद असलेल्या व्यक्‍तीला महत्त्व दिले जाते मात्र, नवीन पिढी सुसंस्कारित करणाऱ्या शिक्षकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भावी पिढी संस्कारित करणे गरजेचे आहे, त्यामुळे आपल्या देशाची प्रगती होईल. सामाजिक हित जोपाणारे अधिकारी देशात पुढे आल्यास देशाचा विकास लवकर होईल.
विश्‍वास देवकाते म्हणाले की, ग्रामीण भागात ज्या मुलभूत गरजा आहेत त्या सोडविण्यावर कंपन्यांनी भर द्यावा. जिल्हा परिषद व जानकीदेवी बजाज ग्रामविकास सामाजिक संस्थेत जो करार झाला याचे मोठे समाधान आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून कंपन्यांचे योगादन मोठे असून ग्रामीण भागातील मुलभूत गरजा पूर्ण करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. ग्राम विकासाचा ध्यास घेतलेल्या जानकी देवी बजाज संस्थेला जिल्हा परिषदेच्यामाध्यामातून मदत केली जाईल. त्यांनी खेड तालुक्‍याबरोबर संपूर्ण जिल्ह्यात काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जीवन कोकणे, तर गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी आभार मानले.

  • शासनाकडून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी खर्च केला जातो मात्र तो खर्च करीत असताना सरकारी कामे चांगली होत नाहीत खाजगी संस्थांनी केलेली कामे चांगली होतात म्हणून यावर जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने संशोधन करून करून त्याची डाक्‍यूमेंटरी करून समाजापुढे ठेवावी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे योगदान मोठे असून त्यांच्यामुळे खेड तालुक्‍यातील आदिवासी भागातील शाळांच्या इमारती चांगल्या प्रकारच्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक वातावरण निर्माण होवून त्यांचा हा उपक्रम इतरांना दिशा दर्शक ठरेल.
    – सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
  • जे सरकारने दिले नाही ते बजाज कंपनीच्या माध्यमातून मिळाले आहे. जिल्ह्यात शासकीय निधी मिळतो मात्र, त्या निधीत चांगल्या दर्जाचे काम होत नाही. खासगी कंपनी तेच काम कमी खर्चात करून दर्जा देते त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कामे खासगी संस्थांना देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसे झाल्यास शासनाचे पैसे वाचतील. कामे दर्जेदार होतील..
    -सुरेश गोरे, आमदार
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)