जिल्हा परिषद नर्सेस संघटना : माझी संघटना

सौ. शांता पवार ( चव्हाण ),अध्यक्ष,जिल्हा परिषद नर्सेस संघटना
सौ. शांता पवार ( चव्हाण ),अध्यक्ष,जिल्हा परिषद नर्सेस संघटना

10 जून 2018 रोजी जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार मी स्विकारला.सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने खर्या अर्थाने नर्सेस भगीनींचे मोलाचे योगदान आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरी व ग्रामीण भागात आमच्या संघटनेच्या नर्सेस भगिनी सर्व प्रकारच्या कामात अग्रेसर असल्याचे दिसते. जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची सुरूवात कुसूमाताई परळे यांनी 28 वर्षापूर्वी केली. आजमितीला यामध्ये 469 नर्सेस सदस्य आहेत.

जिल्हा परिषदेच्या अस्थापनेअंतर्गत येणार्या ए.एन.एम तसेच एन.एम. एल.एच.एम, पी.एच.एन. तसेच एल.एच.व्ही या सर्व डब्ल्यू एच ओ नर्स संघटनेत मोडतात. घरोघरी जावून सर्वे करणे, लसीकरण करणे, गरोदर महिलांचे कॅंम्पचे काम करणे., औषधे देणे, विविध प्रकारच्या कॅम्पचे आयोजन करणे, त्यात सक्रिय सहभाग घेवून गुणवत्तापूर्वक सेवा देण्याची कामे करावी लागतात.आमच्या संघटनेचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जिल्हापरिषद अंतर्गत सर्व नर्सेस भगिनींना संघटीत करणे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवेत व विकास कार्यात सक्रिय राहणे, सर्व नर्सेस भगिनीच्या हिताच्या व त्यांच्या उन्नतीच्या आड येणार्या अडचणींची सोडवण्यासाठी मी प्रयत्नशीत आहे.यामध्ये प्रामुख्याने सभासदांच्या कर्तव्याशी संबधीत प्रश्नांचे व अडचणींचे शासनाकडे शिफारशी करणे, त्यांच्या मानसिक, शैक्षणिक व सांस्कृतिक तसेच आर्थीक बाबीची दखल घेताना त्यांच्या सेवा व संरक्षणाची हमी देण्यासाठी संघटना काम करते. नर्सेस भगीनींचे हित जोपासताना सुयोग्य आरोग्य सेवा प्राधान्याने देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कायमच प्रयत्नशील राहणार आहे.

या कामी शौभा खैरनार महाराष्ट्र राज्य नर्सिंग संघटनेच्या अध्यक्षा, माजी राज्य अध्यक्ष कुसूमताई परळे, सचिव बी.डी.पवार, शकुंतला त्रिभूवन, शेहनाज शेख, कोशाध्यक्ष संघटना सातारा मनीषा पवार, जयश्री शिंदे व सर्व नर्सेस भगिंनीचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)