जिल्हा परिषदेतील होर्डिंग धोकादायक स्थितीत

सातारा, दि.6 (प्रतिनिधी) – जिल्हापरिषदेच्या आवारात लावण्यात आलेले होर्डिंग मोडकळीस आले असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
पुण्यात शुक्रवारी मोठे होर्डिंग पडून चार जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या दुचाकी पार्किंगच्या कडेला लावण्यात आलेले होर्डिंग देखील धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्या होर्डिंगच्या तीन पैकी एक खांब निकामी झाला आहे. तर त्यावर लावण्यात आलेला फ्लेक्‍स देखील फाटला आहे. अशा धोकादायक स्थितीत त्या होर्डिंगच्या खाली नागरिक बसताना दिसून येतायत. त्यामुळे ते होर्डिंग तात्काळ दुरुस्त अथवा न हटविल्यास त्याठिकाणी देखील मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)