जिल्हा परिषदेच्या शाळेत नन्ही-परी उपक्रम

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत महिंद्रा एज्युकेशन टस्ट व नांदी फाऊंडेशनच्या वतीने मुलींच्या शारीरिक व बौद्धीक विकास वाढविण्यासाठी नन्ही-परी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका संगिता शेटे यांनी दिली.
या प्रसंगी सरपंच उर्मिला वळसे पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी टाव्हरे, उपाध्यक्षा गणिता वळसे, सुरेश आवारी, आनंद वळसे, तृप्ती टाव्हरे, भाऊसाहेब सुडके, दिपाली वळसे पाटील, शितल शेवाळे उपस्थित होते. शिक्षण देणे ही सर्वस्वी शिक्षकांची जबाबदारी नसून त्यामध्ये पालकांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची आहे.लहाणपणी झालेले संस्कार हे मुलांचे आयुष्य घडवत असतात. त्यामुळे शिक्षकांबरोबर मुलांकडे पालकांनी तितकेच लक्ष द्यावे, असे मत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. उपक्रमाअंर्तगत शाळेतील 88 मुलींना शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक व बौद्धिक विकास साहित्य देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)