जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी बनविलेला किल्ला

लोणीधामणी- खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दिवाळीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेमध्ये आकाश कंदील व पणती बनविणे, सजावट करणे आदी उपक्रम राबविण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक उज्वला लंगडे, उपशिक्षक कैलास मेंगडे, आरती निमोणकर, मीना अंकुश आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष दादाभाउ वाळुंज, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर धुमाळ, मयुर सुक्रे, राहुल सुक्रे, शुभम सुक्रे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)