जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आजपासून 

file photo
काळभैरवनाथ प्रतिष्ठानतर्फे आयोजन 
पुणे: काळभैरवनाथ विकास प्रतिष्ठान खराडी यांनी पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने 45व्या पुणे जिल्हा कुमार गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन 17ते 22 ऑगस्ट या कालावधीत केले आहे.
कुमार मुले व मुलींसाठी मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेत रोज सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये सामने होणार आहे. मुलांच्या 144 व मुलींच्या 46 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये 67 संघ ग्रामीण भागातील आहेत. या स्पर्धेतून भांडुप येथे 30 ऑगस्टपासून रंगणाऱ्या राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचे संघ निवडण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक बापूसाहेब पठारे यांनी दिली.
मुलांच्या निवड समितीत राजेंद्र पायगुडे, शैलेश मद्रासी, नितीन खाटपे, महेंद्र भांबुरे व शेखर सावंत यांचा समावेश असून मोहिनी जोग, रंजना पोतेकर, नयना मोरे, सुवर्णा येनपुरे व प्रशांत सातव हे मुलींच्या निवड समितीचे सदस्य आहेत.
स्पर्धेचे उद्‌घाटन शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष चेतन तुपे यांच्या हस्ते होणार असून या वेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष बाबूराव चांदेरे, नगरसेवक महेंद्र पठारे, संजिला पठारे, सुमन पठारे व जिल्हा कबड्डी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)