जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा: आलेश्वर संघाचा धर्मवीर बालेवाडी संघावर दणदणीत विजय 

पुणे: येथे सुरु झालेल्या जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पुरूष विभागात पात्रता फेरीच्या दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात आलेश्वर संघाने धर्मवीर बालेवाडी संघावर 35-13 असा दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला आलेश्वर संघाकडे 17-4 अशी आघाडी होती. आलेश्वर संघाच्या संजय हडगळे याने अष्टपैलू, प्रतिक जगताप चढाई व प्रशांत हडगळे यांने चांगल्या पकडी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. धर्मवीर बालेवाडी संघाच्या परशुराम भोंडवे, प्रतिक बालवडकर, साईराज बालवडकर याने चांगला खेळ केला.

दरम्यान दुसऱ्या सामन्यात सेव्हनस्टार डोरलेवाडी संघाने वंदेमातरम्‌ संघावर 51-16 दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला सेव्हन स्टार संघाकडे 24-4 अशी भक्कम आघाडी होती. सेव्हन स्टार संघाच्या अक्षय जमदाडे याने चौफेर आक्रमक खेळ केला. त्याला संदीप महुडे याच्या चढाया व शरद माने याने केलेल्या उत्कृष्ट पकडींच्या जोरावर हा विजय मिळविला. वंदे मातेरम्‌ संघाच्या ओकांर भिलारे व केतन चौधरी यांने चांगला प्रतिकार केला.

-Ads-

बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन संघाने बारामतीच्या स्पोर्टस्‌ ऍकॅडमी संघावर 47-23 असा विजय मिळविला. मध्यंतराला दोन्ही संघ 18-18 समान गुणांवर होते. मध्यंतरानंतर मात्र बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनच्या प्रमोद जिरपे, कलम सिंह, प्रमोद सिंग व जाफर शेख यांनी आक्रमण वाढवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला. स्पोर्टस्‌ ऍकॅडमीच्या सत्यजीत पानसरे यांने चांगला प्रतिकार केला. मॉर्डन स्पोर्टस्‌ क्‍लब संघाने राजगुरूनगरच्या आर्ट फौंडेशन संघावर 43-11 असा विजय मिळविला. मध्यंतराला मॉर्डन स्पोर्टस्‌ संघाकडे 23-7 अशी भक्कम आघाडी होती.मॉर्डन संघाच्या अमित जमदाडे व ज्ञानेश्वर शितोळे यांनी जोरदार खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आर्ट फौंडेशनच्या मयुर दरेकर याने चांगला प्रतिकार केला.

महाळुंगे (पाडाळे) येथील कै.आनंता पाडाळे यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हा कबड्डी पुरूष व महिला गट अजिंक्‍यपद व निवड चाचणी स्पर्धेची सुरवात येथील सरपंच मयुर भांडे, स्पर्धा मुख्य आयोजक निलेश पाडाळे, सुखदेव कोळेकर, बबन हगवणे, नामदेव पाडाळे, पाटील कामठे, विशाल चौधरी, नामदेव गोलांडे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, सरकार्यवाह मधुकर नलावडे, दत्तात्रय झिंजुर्डे, स्पर्धा पंच प्रमुख भरत शिलीमकर, सहकार्यवाह शिल्पा भंडारी,सदस्य प्रकाश बालवडकर,संदीप पायगुडे यांच्या उपस्थितीत पात्रता फेरीच्या सामन्यांना सुरवात झाली.
उर्वरीत सामन्यांचे निकाल पुढील प्रमाणे- नवतरूण क्रीडा मंडळ वि.वि. सचिनभाऊ दोडके(43-26), अतुलदादा बेनके वि.वि. धर्मराज संघ गिरवली (21-13), नवचैतन्य क्रीडा मंडळ वि.वि. नवखंडेनाथ उरवडे(25-12),

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)