जिल्हा कुस्ती स्पर्धेत फलटणच्या मल्लांची दंगल

दोन सख्ख्या भावांसह चौघे विजेते : विभागीय स्पर्धेसाठी निवड

गोखळी, दि. 28 (वार्ताहर) – भुईंज येथे झालेल्या जिल्हा कुस्ती स्पर्धेत फलटण तालुक्‍यातील मल्लांनी विजेतेपद मिळवले. जय नितीन शेडगे, तेजेस नितीन शेडगे हे भाऊ, श्रुती गेजगे आणि आरती घोरपडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भुईज येथे झालेल्या जिल्हास्तरीय पुरूष कुस्ती स्पर्धेत 17 वर्षे वय आणि 51 किलो गटात जय नितीन शेडगे यांनी, 14 वर्षे वय आणि 41 किलो वजन गटात तेजेस नितीन शेडगे या ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी भाग शाळा आसूच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवला.
महिला कुस्ती स्पर्धेत गोखळीतील हनुमान विद्यालयाची श्रूती गेजगे हिने 14 वयोगट व 41 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. कोल्हापूरला होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी या सर्वांची निवड झाली आहे. तसेच पानीव, ता. माळशिरस येथे झालेल्या जिल्हा महिला कुस्ती स्पर्धेत मुंजवडी येथील आरती घोरपडेने 17 वयोगटात 43 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवला असून तिचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती शिंदेवाडीच्या हनुमान विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
यशस्वी मल्लांना वस्ताद बाळासाहेब साबळे, अजित शेलार, अनिल गावडे, नवनाथ खुरंगे, एस.वाय. जाधव यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी मल्लांचे जिल्हा बॅंकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, उद्योगपती बंटीराजे खर्डेकर, पंचायत समिती उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर, जि. प. सदस्या सौ. उषादेवी गावडे, सौ.वैशालीताई गावडे, मनोज गावडे, सरपंच अमित गावडे, नंदकुमार गावडे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)