जिल्हा किशोर निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 13 पासून रंगणार 

प्रभात वृत्तसेवा 
पुणे – पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने श्री दत्त मित्रमंडळ, दत्तनगर, बाणेर यांच्या वतीने किशोर गटाच्या जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेसाठी किशोर गटातील मुले व मुलींचे पुणे जिल्ह्याचे संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार असल्यामुळे या स्पर्धेतील सहभागाला महत्त्व आहे.
येत्या 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेचे प्रवेश अर्ज एक ते सात सप्टेंबर दरम्यान पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या कार्यालयात स्वीकारले जातील. सात सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती संघटनेचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे यांनी दिली आहे. ही निवड चाचणी कबड्डी स्पर्धा कै.सोपानराव बाबुराव कटके प्राथमिक विद्यालय, (मनपा शाळा क्रमांक 151- बी) बाणेर गावठाण, बाणेर येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)