जिल्हास्परीय विज्ञात प्रदर्शानात खेड तालुक्‍याची बाजी

चाकण- जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात खेड तालुक्‍याने विशेष यश मिळवित बाजी मारली आहे. तर भामचंद्र विद्यालय भांबोली या प्रशालेने प्रकल्पात प्रथम आणि प्रश्नमंजुषात द्वितीय क्रमांक मिळाला. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन शिरूर येथे घेण्यात आले. त्यातून राज्यस्तरासाठी खेड तालुक्‍याचे प्रकल्प निवडण्यात आले. यात इ. 9 वी ते 12 वी गटात प्रथम भामचंद्र विद्यालय, भांबोली (फोरव्हिलर चोरी रोखणे), इ.9 वी ते 12 वी : आदिवासी गट : आदर्श विद्यालय, आंबोली (प्रथम), लोकसंख्या शिक्षण , प्रथम (जि.परिषद शाळा,पाईट शिंगाडे मॅडम), शैक्षणिक साहित्य निर्मिती (प्राथमिक गटात) द्वितीय, जिल्हा परिषद शाळा, टाकळकरवाडी यांचे रेटवडे सर यांचा व लोकसंख्या शिक्षण (माध्यमिक विभाग) तृतीय क्रमांक पवार मनिषा (ज्ञानेश्‍वर विद्यालय, आळंदी) यांचा तर प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत (इ. 9वी ते 12वी गटात ) भामचंद्र विद्यालय, भांबोली प्रशालेच्या निकिता शेटे व जीवन करंडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तर प्रकल्पात चारचाकी वाहने चोरी थांबविणे याचा शुभम सोनार याने प्रथम क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना रमेश बोऱ्हाडे व इतर विज्ञान शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे भामचंद्र संस्थेचे अध्यक्ष अजित बुट्टेपाटील व सचिव तानाजी केंदळे, उपाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिक्षण समिती अध्यक्ष विलास काळे, सल्लागार ऍड. बाळासाहेब लिंभोरे व संचालक यांनी अभिनंदन करून कौतूक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)