जिल्हास्तरी क्रीडा स्पर्धेत बाबुर्डी शाळेला मोठे यश

श्रीगोंदा – तालुक्‍यातील बाबुर्डी शाळेचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धत घवघवीत यश मिळाले. कोपरगाव तालुक्‍यातील कोकणठाण या ठिकाणी दि.19 व 20 जानेवारी रोजी सांघिक व मैदानी क्रिडा प्रकारात (लहान गट) मूलींचा खोखोचा संघ विजेता ठरला तर मुलांचा खोखो संघ उपविजेता ठरला.

नाशिक विभागीय पातळीवर निवड झाली. 400 मीटर धावणे (लहान गट) वैष्णवी शिर्के जिल्ह्यात प्रथम तर 600 मीटर धावणे प्रतिक शिर्के दुसरा आला. विभागीयसाठी निवड. 400 मीटर (रिले) लहान गट उपविजेता ठरला. व इस्त्रो दौरा पूर्ण केल्याबद्दल अर्चना शिर्के तर खोखो (मुले) वैभव शिर्के (कर्णधार) अभंग शिर्के, पुंडलीक शिर्के, ओम शिर्के, ओंकार शिर्के, ओम शिर्के, जीवन शिर्के, आयुष शिर्के, अथर्व शिर्के, तेजस बरकडे, योगेश शिर्के, सागर शिर्के. मूली (खोखो)- तनुजा शिर्के (कर्णधार) वैभवी शिर्के, वैष्णवी बोरुडे, वैष्णवी शिर्के, स्नेहा शिर्के, प्रियंका उदमले, स्वरूपा शिर्के, योगिता बोरूडे, तनिष्का शिर्के, सानिका चव्हाण, सोनाली पिसाळ, प्रा. जक्ता उदमले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)