जिल्हास्तरीय सायकल स्पर्धेत गुंजाळवाडी विद्यालयाला अजिंक्‍यपद

नारायणगाव- जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे तसेच गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव आयोजित जिल्हास्तरीय सायकल स्पर्धेत ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी शाळेतील 11 खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. त्यापैकी 9 खेळाडूंची निवड अहमदनगर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे यांनी दिली.
ही स्पर्धा नारायणगाव येथे झाली. उदघाटन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अजय गोरड व पत्रकार किरण वाजगे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे – 14 वर्षे वयोगट मुले / मुली- आर्यन संतोष गाढवे – मास स्टार्ट -प्रथम 2) तेजस शेखर वाळुंज- वैयक्तिक टा. ट्रायल -प्रथम 3) प्रज्वल ज्ञानेश्वर डोंगरे – वैयक्तिक टा. ट्रायल – द्वितीय 4) प्रांजल संदिप सोलाट- वैयक्तिक टा. ट्रायल -व्दितीय
17 वर्षे वयोगट मुले/ मुली- वैष्णवी संतोष शिंदे-मास स्टार्ट – द्वितीय 2) प्रियंका सुरेश डोंगरे – वैयक्तिक टा. ट्रायल -द्वितीय 3) ओंकार प्रमोद तोडकर – वैयक्तिक टा. ट्रायल -तृतीय. 19 वर्षे वयोगट मुले / मुली- ओंकार सुनिल सोलाट – वैयक्तिक टा. ट्रायल- प्रथम 2) कावेरी शैलेश मनसुख- मास स्टार्ट – प्रथम 3) सानिका नामदेव भांगे- वैयक्तिक टा. ट्रायल- प्रथम 4) प्रतिक्षा देविदास सोलाट – वैयक्तिक टा. ट्रायल- तृतीय.
सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्याध्यापक एच. पी. नससुडे, क्रीडा शिक्षक ए. बी. कानडे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचा सत्कार ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, उपाध्यक्ष सुरेश संचेती, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, कार्यवाह रविंद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, विद्यालयाचे चेअरमन आल्हाद खैरे, क्रीडा समिती प्रमुख सुजित खैरे व गुंजाळवाडी गावचे सरपंच युवराज शिंदे, आदींसह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल शिंदे व गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)