संग्रहित फोटो

कोरेगाव भीमा- शिरुर येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत 236 विद्यार्थ्यांमध्ये सुवर्ण पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि पुणे जिल्हा चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा चिंचवड येथे आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुशांत यादव याने सुवर्ण पदक पटकाविले. शाळेचे क्रीडा प्रशिक्षक विजय चोरडिया यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, मुख्याध्यापक गणेश मिटपल्लीवार, संस्थेचे शैक्षणिक सल्लागार के.बी.सोनवणे, सरव्यवस्थापक प्रदीप लांजेवार, व्यवस्थापक सुनील शिंदे आणि सोनाली परदेशी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)