कोरेगाव भीमा- शिरुर येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) मधील 2 विद्यार्थीनींनी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा आणि युवक संचालनालय आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव नऱ्हे येथे येथे नुकतीच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई)ची विद्यार्थीनी श्रुती शेटे हिने सुवर्ण पदक पटकावले असून तिची विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर वर्षा नऱ्हे हिने या स्पर्धेत कास्य पदक मिळविले. शाळेची क्रीडा प्रशिक्षिका प्रसन्न वाळुंज यांनी अथक परिश्रम घेतले. या संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, मुख्याध्यापक गणेश मिटपल्लीवार, संस्थेचे शैक्षणिक सल्लागार के.बी.सोनवणे, सरव्यवस्थापक प्रदीप लांजेवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)