जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

सातारा – शिक्षण महर्षी प. पू. डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा नुकत्याच शाहू स्टेडियम सातारा येथे उत्साहात पार पडला.

या स्पर्धेचे संयोजन श्री भवानी विद्यामंदिरचे प्राचार्य एस. टी. कदम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले. या मैदानी स्पर्धेमध्ये विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व तालुक्‍यामधील प्रथम व द्वितीय आलेल्या 552 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रथम सर्व स्पर्धकांनी क्रीडांगणावर संचलन केले. उद्‌घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना संस्थेचे सहसचिव प्रा. आर. व्ही. शेजवळ यांनी या जन्मशताब्दी महोत्सवातील या क्रीडा स्पर्धांचे महत्त्व सांगितले.

याप्रसंगी त्यांनी बापूजींच्या योगदानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खेळांचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय खेळाडू अभिषेक जाधव यांनी विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्तीची शपथ दिली. सोहळ्यासाठी जिल्हा क्रीडा आधिकारी युवराज नाईक व बाबर साहेब, संस्थेचे माजी सहसचिव एन. जी. गायकवाड, आर. के. भोसले, माजी प्राचार्य आजीवसेवक के. जी. ढवळे, बी. एच. सपकाळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. बी. सुर्वे यांनी श्री भवानी नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. एम. कांबळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)