जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी चैतन्य विद्यालयाची निवड

ओतूर- ग्रामविकास मंडळ ओतूर (ता. जुन्नर) संचलित चैतन्य विद्यालय ओतूरने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 14 वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयाची निवड झाली आहे, अशी माहिती विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमूख शरद माळवे यांनी दिली.
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा स्व. रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूल शिरोली (निवृत्तीनगर) येथे संपन्न झाल्या. यामध्ये तालुक्‍यातील 42 संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाचा 13 गुणांनी पराभूत करून विजय संपादन केला.
विजयी संघातील खेळाडू :
शिवांजली ढमाले, ऋतूजा डुंबरे, तनुजा वाकर, आकांक्षा गाढवे, ऐश्वर्या पानसरे, साक्षी डोंगरे, वैष्णवी डुंबरे, आदिती डुंबरे, साक्षी देठे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय इसकांडे, शरद माळवे, अमित झरेकर, देवचंद नेहे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, रघुनाथ तांबे, राजेंद्र डुंबरे, प्रदिप गाढवे यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)