जिल्हावासियांच्या सेवेत अग्रणी असलेली “बालाजी ब्लड बॅक’

सातारा, दि. 13 (प्रतिनिधी) –
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सातारा येथील बालाजी बल्ड बॅंकेची ओळख “प्रभात’ करून देत आहे. बॅंकेचे संचालक महेशकुमार वसंतराव भोसले हे मुळचे अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ जि. सांगलीचे रहिवासी. अनेक वर्षे ते सातारामध्येच राहत आहेत. गावामध्ये दुष्काळ पडल्यानंतर करायचे काय, म्हणून सातारा येथे नोकरी करण्याचा निणर्य घेतला. सातारा येथील एका रक्तपेढित काही वर्षे काम केले. अनुभवाच्या जोरावर स्वत:ची ब्लड बॅंक सुरू केली. ना. आर. आर. आबा पाटील शिक्षण, शेती, संशोधन आणि विकास संस्थेच्या माध्यमातून बालाजी ब्लड बॅंकेची सुरूवात करताना आज सातारा जिल्ह्यामध्ये आपली ओळख निर्माण केली असल्याचे भोसले सांगतात.
सातारामध्ये अद्ययावत अशी 24 तास रक्तपेढी सुरू असून विविध प्रकारच्या रक्तदात्यांना सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. यावर्षीपासून मोबाईल व्हॅन संकल्पना सुरू करून आपण रक्तदात्यांपर्यंत सहज पोहचून रक्तदान करण्यासाठी सहज कोठेही त्वरीत पोहचण्याची सोय पहिल्यांदा आपल्या बॅंकेने केली आहे. बालाजी बॅंकेचे वैशिष्ट पुढिलप्रमाणे आहेत. सर्व प्रकारचे रक्तघटक, पी.सी.बी., प्लाज्मा, प्लेट लेट, हे रक्त घटक रक्तपेढीत मिळतात. बॅंकेपासून हॉस्पिटलपर्यंत 24 तास रक्त पोहच करण्याची सुविधा आहे. रक्तदात्यास त्याच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तिंना दोन वर्षापर्यंत रक्त मोफत दिले जाते. रक्तदात्याने आपल्या आयुष्यामध्ये जितके रक्तदान केले आहे, त्या प्रमाणात मोफत रक्त देण्याची सुविधा आहे. रक्तदान शिबिरांकरता 10 टक्के मोफत रक्त देण्याची सुविधा, याचबरोबर थॅलेसिमिया, हिमोफेलिया या रूग्नांना मोफत रक्तपुरवठा केला जातो.
सिंगल डोनर प्लेट लेट मशीनसची सातारा जिल्ह्यामध्ये एकमवे सुविधा आपल्या ब्लड बॅंकेत आहे. सुरूवातीला 4 व्यक्तिंना घेवून सुरू केलेली रक्तपेढीत आज प्रशिक्षीत अशा 22 व्यक्तिंचा स्टाफ आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक रक्तदात्यांना बालाजी ब्लड बॅंकेचे नाव सुपरिचित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)