जिल्हावार शिक्षण व प्रशिक्षण केंद्रांची पुनर्रचना

पुणे  – राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणे, त्यांचे प्रशिक्षण घेणे, शिक्षण विषयात संशोधन, अभ्यासपूर्ण लेखन करणे आदी गोष्टींसाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर असणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र म्हटजेच डाएट संस्थांची पुनर्रचाना शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.
केंद्र सरकाने सर्व डाएट केंद्रांमध्ये एकसुत्रता यावी यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता सर्व डाएटचे एकत्रिकरण करत चार विभागांमध्ये विभागणी केली आहे. त्यामध्ये शिक्षक शिक्षण विभाग, व्यवसाय शिक्षण व सातत्यपूर्ण व्यवसाय विकास प्रशिक्षण, संशोधन, क्षेत्रिय आंतरक्रिया, समता विभाग तर अभ्यासक्रम विकसन व मूल्यमापन, शैक्षणिक व माहिती तंत्रज्ञान, संदर्भ साहित्य विकसन विभाग आदी विभाग असणार आहेत. या चारही विभागांना आपापल्या जबाबदाऱ्या शिक्षण विभागाने वाटून दिल्या असून भविष्यात शाळांचे श्रेणीसुधार करण्याचे कामही याच संस्थांकडे देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)