पुणे – आगामी निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपीएटी (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) ही प्रणाली वापरली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने या नव्या मशीन प्राप्त झाल्या आहेत. नव्याने प्राप्त झालेल्या एमथ्री-इव्हीएम व व्हीव्हीपीएटी मशीन संदर्भात फर्स्ट लेव्हल चेकिंग(एफएलसी)ची तांत्रिक माहिती तसेच ही यंत्रणा नेमकी कशी कार्य करते, याची माहिती राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.

यशदा येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वतीने निवडणूक विषयक इव्हीएम व व्हीव्हीपीएटी याबाबत राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. यात सर्व जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक अधिकारी आश्‍विन कुमार यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना व्हीव्हीपीएटी मशीन वापराचे प्रशिक्षण दिले.

यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडील तज्ज्ञ अधिकारी तसेच बेंगळुरू येथील बीईएल तज्ज्ञांनी अधिकाऱ्यांना ही यंत्रणा नेमकी कशी कार्य करते यांची माहिती दिली. तसेच तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले आणि सखोल माहिती देण्यात आली.

कार्यशाळेत सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकारी व निवडक मतदार नोंदणी अधिकारी यांना निवडणूक आयोगातर्फे प्रशिक्षण देण्यात आले. नवतरुण मतदारांमध्ये निवडणूक विषयक जागरुकता निर्माण होण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली माहिती पुस्तिका देण्यात आली. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या तरुण मतदारांना निवडणूक विषयक माहिती सहज व सोप्या पध्दतीने उपलब्ध व्हावी यासाठी विविध प्रकारच्या खेळांच्या माध्यमातून माहिती कशी देता येईल. तसेच, मतदार साक्षरता क्‍लब याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. अपंग कल्याण आयुक्त यांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले, असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)