सातारा, दि.5 (प्रतिनिधी)
सातारा शहरातील जिल्हाधिकारी निवास्थान परिसरातील चंदनाची झाडे चोरीला गेली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. सातारचे मंडलाधिकाऱ्यांनी याची तक्रार दिली आहे.
शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच थेट सातारा जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या परिसरात तब्बल 10 ते 12 चंदनाची झाडेच तोडून नेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैनिक स्कूल परिसरातही गेल्या काही दिवसांपूर्वी चंदनाची 2 झाडे चोरीला गेली होती.
सर्कल अधिकारी शिवाजी पिसाळ यांनी याबाबतची माहिती शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. सातारा- कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा न्यायालयाच्या समोरच जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान आहे. या परिसरात दि. 3 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी 10 हजार रुपये किंमतीची 10 ते 12 चंदनाची झाडे चोरून नेली. याची माहिती मिळताच सर्कल अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पोलिसांना माहिती दिली. दाखल तक्रारीचा तपास सातारा शहरचे पो.ना. गावीत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)