जिल्हाधिकारी कार्यालयात पार्किंगचा बोजवारा

भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट: घाणीचे साम्राज्य निर्माण

सातारा,दि.5 प्रतिनिधी- जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसून येत आहे. परिसरात वाहनांच्या पार्किंगचा पुर्णपणे बोजवारा उडाला असून येथे भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाटच झालेला आहे. त्याचप्रमाणे आवरात असलेल्या ओढ्यामध्ये शहरातून ड्रेनेजचे पाणी येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

-Ads-

जिल्हाधिकारी कार्यालयात रोज हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. त्यापैकी बहुतांश सर्वसामान्य नागरिक हे दुचाकीवरून तर श्रीमंत आणि अधिकारी वर्ग हे चारचाकी वाहने घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. मात्र, या वाहनधारकांनी आपले वाहन नेमके कसे पार्क करावे, यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. जिल्हा परिषदेप्रमाणे पार्किंगसाठी पांढरेपट्टे ओढण्यात आले नाहीत. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नूतन प्रशासकीय इमारतीखाली स्वतंत्र पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली असताना त्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत नाहीत. अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची ही वाहने सर्व नियम डावलून आवारात अस्ताव्यस्त पध्दतीने पार्क केलेली दिसून येतात. त्यामुळे अनेकवेळा त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते.

पार्किंगची अशी स्थिती असताना आता आवारात भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्या ठिकाणी भटक्‍या कुत्र्यांच्या टोळ्या जोरदारपणे भुंकत असतात मात्र त्यांना हटकण्यासाठी साधा एक ही शिपाई पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात भटक्‍या कुत्र्यांनी त्या ठिकाणी एखाद्या नागरिकावर अथवा अधिकाऱ्यावर हल्ला केला तर नवल वाटायला नको. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाण्याचा ओढा आहे. मात्र, सध्या या ओढ्यात शहरातून येणारे ड्रेनेज सोडण्यात आल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी त्या ठिकाणी येणारे नागरिक नाकाला रूमाल लावून कार्यालयात जाताना दिसून येत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)